वेणेगाव - हयूमन या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्राचे मुख्य संपादक डॉ.अमितकुमार आनंदराव खाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ.खाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्षे सक्रिय पदाधिकारी म्हणून विविध पदावर कार्यरत आहेत.
डॉ. अमितकुमार खाडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पीएचडी चे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच आयआयएम, केईएम मुंबई अशा संस्थांतून त्यांनी शिक्षण घेतले असून सामाजिक कार्याचे आवड जोपासत राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय संघटनेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना आजपर्यंत सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य औषध परिषद, राज्य केमिस्ट संघटना अशा संस्थांवर सन्माननीय व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे. ह्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव व राज्य संपर्कप्रमुख सचिन सरदवे त्यांनी नियुक्तीची घोषणा केली.
सदरच्या नियुक्तीनंतर डॉ. खाडे तिचा सत्कार खा. नितीन पाटील, उदयसिंह पाटील उंडाळकर व राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी केला व शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी डॉ. अमितकुमार खाडे यांची निवड
July 07, 2025
0
Tags

Post a Comment
0 Comments