अ. भा.ब्राह्मण महासंघाचा सातारा जिल्हा कार्यकारणी नियुक्तीपत्र पददान कार्यक्रम सपन्न
वेणेगांव - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची सन 2025 -2027 सालची सातारा जिल्हा, तालुका, शहर कार्यकारणी जाहीर झाली.या कार्यकारणीचा नियुक्तीपत्र पददान कार्यक्रम दि. 12 जुलै रोजी सातारा येथील हॉटेल आरंभ या ठिकाणी संपन्न झाला
सातारा जिल्हा कार्यकारणीचा नियुक्तीपत्र पददान कार्यक्रम संपन्न झाला या वेळी जिल्हा अध्यक्ष यांनी नवनियुक्त कार्यकारणी सदस्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मनोगत व्यक्त करताना म्हणाले येणाऱ्या काळात अ.भा. ब्राह्मण महा संघ सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून संघाचे विचार जिल्ह्यातील प्रत्येक गावातील समाज बांधवापर्यंत पोहचवेल आणि संघाच्या प्रवाहात आणेल. याच बरोबर येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यात नवनविन उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न होईल या साठी लागेल ती मदत संघा कडून देण्याचा प्रयत्न केला जाईल. याच बरोबर संघाची वार्षिक वर्गणीही जाम करण्याचे तसेच जास्ती जास्त सभासद वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. संघाच्या सल्लगार सौ. दीपाली ताई कुलकर्णी यांनी संघाच्या शहर तसेच तालुक्यातील शाखा कशा पद्धतीने वाढतील या बाबत येणाऱ्या काळात निश्चित प्रयत्न करून समाजा साठी विविध उपयोगी उपक्रम राबवले जातील असे मनोगत व्यक्त केले. या वेळी समाजातील युवक तेजस देशपांडे संनदी लेखापाल (C.A.) या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्या बद्दल संघाच्या वतीने त्याचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी जिल्हा सल्लागार समिती सदस्य सौ दिपालीताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष सुरेश काणे ,जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ मंजिरी महेश काणे तसेच जिल्हा सचिव पराग बोडस उपस्थित होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी सुजित कुलकर्णी, जिल्हा महिला उपाध्यक्षपदी वृषाली मेहंदळे, सातारा शहर अध्यक्षपदी निलेश कुमठेकर, उपाध्यक्ष जयंत कार्लेकर ,सचिव सौ प्रज्ञा लाटकर , सातारा शहर युवा आघाडी अध्यक्ष गणेश मेहंदळे तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड.सन्मान आयाचित,जुगल किशोर ओझा, गणेश बापट ,प्रमोद पंचपोर ,उदय कुलकर्णी ,जयंत बेडेकर , ॲड. मैत्रेयी कुलकर्णी,सौ.शरयू माटे,सौ इशिता भंडारे, सौ माधुरी पोतदार ,सौ भाग्यश्री लेले, सौ अनिता
जोशी, मनीषा आपटे, पूजा शर्मा ,जिल्हा पुरोहित आघाडी ओंकार आपटे (गुरुजी) ,राहुल कुलकर्णी (गुरुजी), सातारा जिल्हा युवा आघाडी ऋत्विक सुभेदार, प्रभंजन बडवे ,तेजस भागवत, अश्विन काळे, जावळी तालुका संपर्कप्रमुख श्रीहरी पाटील , महाबळेश्वर तालुका संपर्कप्रमुख ऋषिकेश महाबळेश्वरकर (गुरुजी), पाटण तालुका संपर्कप्रमुख संतोष पराडकर, कोरेगाव तालुका संपर्कप्रमुख श्रेयस काणे, रमेश गोडबोले , माण तालुका संपर्कप्रमुख दत्तात्रय पोतदार, उदय बडवे ,नितीन पाठक यांची विविध पदांवर निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग बोडस यांनी केले व सौ मंजिरी महेश काणे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments