शिरगांव मधील महिलांमध्ये डिजिटल क्रांती होणार - समता ताई घोरपडे
वेणेगांव - आज पुरुषांच्या तुलनेत स्रिया ही प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत. आज डिजिटल युग आहे या मध्ये ही शिरगांव मधील महिला डिजिटल क्रांती करतील असे गौरव उदगार स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर च्या अध्यक्षा सौ समता ताई घोरपडे यांनी शिरगांव येथील महिलांच्या आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रमात काढले.तसेच आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून अविरत पणे शासकीय योजनांचा लाभ ही शिरगांव मधील महिलांना दिला जाणार आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या सहकार्याने लाडली फाऊंडेशन तसेच एन पी एस टी आयोजित महिलांचे आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम शिरगाव तालुका कराड येथे घेण्यात आला या वेळी महिलांसाठी घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी डिजिटल माध्यमाच्या पर्यायांमधून डिजिटल गोल्ड, डीजी लॉकर, म्युचल फंड, एनपीएस पेन्शन, टाईम पे बाबत महिलांनी उस्फूर्तपणे मार्गदर्शन घेतले. यावेळी उपस्थित महिलांमधून काही महिलांनी डिजिटल गोल्ड तसेच डीजी लोकर छोट्या नाटिकेच्या माध्यमातून सादरीकरण केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात 50 महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमातील महिलांनी प्रशिक्षण आमच्यासाठी नवीन, प्रेरणादायी तसेच आमच्या सामाजिक जीवनात उपयोगी पडणारे आहे. तसेच डिजिटल गोल्ड चा आमच्या घरातील मंगल कार्य तसेच इतर प्रसंगात आम्हाला डिजिटल गोल्ड च्या माध्यमातून आमचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे याचबरोबर डीजी लोकर च्या माध्यमातून आम्हाला इथून पुढे कोणतीही कागदपत्र जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही असे मत व्यक्त केले. या वेळी प्रशिक्षण सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी सखी मंच च्या कार्याध्यक्षा तेजस्विनी ताई घोरपडे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या आज शिरगांव मधील महिलां मोड्या संख्येने उपस्थित राहिल्याने आजचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झाला. असेच स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून विविध उपयोगी पडणारे प्रशिक्षण शिबीरे तसेच योजना राबविणार असून यापुढेही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षण शिबिर आणि योजनांचा लाभ घ्यावा.
सदरील कार्यक्रमासाठी स्वाभिमानी सखी महिला मंच च्या अध्यक्षा समता ताई घोरपडे, कार्यध्यक्षा तेजस्विनी घोरपडे तसेच शिरगाव मधील महिला उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments