महिलांचे डिजिटल सक्षमीकरण काळाची गरज - तेजस्विनीताई घोरपडे
वेणेगांव - स्मार्टफोन इंटरनेट सर्वसामान्य पर्यंत पोहोचले असून त्याचा वापर वाढत असताना काही जन त्याचा गैरवापर हे करत आहेत. बरेचदा महिला या त्यांचे लक्ष असते. त्यामुळे सर्वांनाच विशेषता युवती महिलांना डिजिटल साक्षर करणे काळाची गरज झाली आहे. असे मत स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर च्या कार्याध्यक्ष तेजस्विनीताई घोरपडे यांनी महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान 15 जुलै मंगळवार रोजी निनाम ता सातारा येथे व्यक्त केले.सदरील कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी महिला सखी मंच च्या अध्यक्षा समता ताई घोरपडे या लाभल्या.
21 व्या शतकात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्याचा वापर महिलांनी योग्य पद्धतीने केला तर महिला आर्थिक सक्षम होती. याच विचारातून स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर मधील महिलांसाठी महिला आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रम राबवीत असून या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याने महिलांमधून समाधान ही व्यक्त होत आहे. यापुढेही कराड उत्तर चे लोकप्रिय आमदार मा. मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून महिलांसाठी लाभाच्या योजना तसेच उपक्रम राबवले जातील त्याचा लाभ महिलांनी घ्यावा तसेच आमदार मनोज दादा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेती पंप योजना चालू असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असेही पुढे बोलताना सांगितले.
सदरील कार्यक्रमसाठी उपस्थित असलेल्या महिलांनी कार्यक्रमात सादरीकरण करून डिजिटल प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे समजावून सांगितले. या कार्यक्रसाठी स्वाभिमानी सखी मंच च्या अध्यक्षा समता ताई घोरपडे, कार्याध्यक्षा तेजस्विनी ताई घोरपडे,एन पी एस टी चे पुणे येथील प्रशिक्षक किरण घुले तसेच निनाम गावातील सखी मंच च्या सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments