म्हसवड पोलिसांचा वरकुटे मलवडी जुगार अड्डयावर कारवाईचा आसूड
3लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाला !! 11 जण ताब्यात
सातारा - म्हसवड पोलिसांनी वरकुटे मलवडी ता. मान येथील तीन पाणी खेळणाऱ्या जुगार अड्डयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत 3 लाख 12 हजार 670 रुपयांच्या मुद्देमाला जप्त करून 11 जनांवर कारवाई करत ताब्यात घेण्यात आले.
म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वरकुटे मलवडी ता माण गाव च्या हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या अडोशाला काही इसम तीन पाणी पत्यावर पैज म्हणून जुगार खेळत असल्या बाबत गोपनीय माहिती मिळाल्या नंतर तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाप सह माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 11आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून या मध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून या मध्ये ताब्यात घेण्यात आलेले आरोपी खालील प्रमाणे 1)कबीर विठ्ठल बनसोडे 2) अर्जुन सर्जेराव यादव 3) सचिन अंकुश यादव 4) गणेश दिगंबर बनसोडे 5) विजय भानुदास जगताप 6) विकास हरी यादव 7) नानासो रामचंद्र मंडले 8) बाळासाहेब रावसाहेब मिसाळ 9) संभाजी मल्हारी मंडले 10) सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे 11) शिवाजी राम पिसाळ
वरील सर्व आरोपी राहणार वरकुटे मालवडी ता माण
सदरील कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे,अमर नारनवर,देवानंद खाडे,रुपाली फडतरे,जगन्नाथ लुबाळ,नवनाथ शिरकुळे,सतीश जाधव श्रीकांत सुद्रिक, अनिल वाघमोडे,पोलीस मित्र नारनवर यांनी केली.

Post a Comment
0 Comments