मोटार सायकल चोरटा अलगद बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात
वेणेगांव - बोरगाव पोलीस ठाणे च्या हद्दीतील ओंकार विलास घाडगे रा कामेरी याच्या कडे चोरीची मोटार सायकल असल्या बाबत डी बी पथकाला पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली त्या आधारवर डी.बी. पथकाने शिताफिने केलेल्या कारवाईत मोटार सायकल चोरटा अलगद बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात आला.
बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. 17 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजनेच्या सुमारास डि. बी. पथक नियमित पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली कि ओंकार विलास घाडगे रा कामेरी ता सातारा याचे जवळ चोरीची गाडी असून तो बोरगाव बाजूकडे येत आहे.डि. बी. पथक नियमित पेट्रोलिंग करीता नांदगाव बाजूकडे जात असताना आंबेवाडी ता सातारा हद्दीमध्ये गावच्या कमानी समोर बोरगाव ते नांदगाव जाणाऱ्या डांबरी रोडवर सदरील ओंकार विलास घाडगे मोटार सायकल चालवीत बोरगाव बाजूकडे जात असताना दिसला.त्यास थांबवून जागीच पकडून त्याच्या जवळ असणारी हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल क्र एम एच 06 आर 7492 ची माहिती घेतली असता बोरगाव पोलीस ठाणे गु. र. नं 174/2025 भा. न्या. स कलम 303(2) प्रमाणे फिर्यादी शाम यशवंत निकम रा. अपशिंगे मि यांनी गुन्हा दाखल केला असल्याचे निष्पन्न झाले ओंकार घाडगे याला विश्वासात घेउन चौकशी केली असता त्याने 07/07/2025 रोजी सायंकाळी 5.30 वा. चे सुमारास वळसे हद्दीतील प्रीतीसंगम पेट्रोलपंपाचे शेजारी प्रीतीसंगम बार बाहेर उभी असलेल्या मोटार सायकलचे हॅण्डललॉक तोडून चोरी केली असल्याचे सांगितले. ओंकार घाडगे याला अटक केली आहे.
सदरील कामगिरी सपोनि धोंडीराम वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ. दिपककुमार मांडवे,मोना निंबाळकर,पो. ना प्रशांत चव्हाण,पो.कॉ. केतन जाधव,सतीश पवार, विशाल जाधव,संजय जाधव यांनी केली.
बोरगाव पोलिसांनी शिताफिने केलेल्या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments