वेणेगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आ. मनोज दादा घोरपडे यांचा सामाजिक उपक्रम — रक्तदान शिबीर उत्साहात
वेणेगाव - वेणेगाव (ता. सातारा) येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तसेच कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये स्वाभिमानी सखी मंच कराड उत्तरच्या अध्यक्षा सौ. समता ताई घोरपडे आणि कार्याध्यक्षा तेजस्विनी ताई घोरपडे यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी महिलांमध्ये समाजाभिमुख उपक्रमांबाबत जागृती घडवून आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रहिमतपूर मंडल महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व वेणेगावच्या माजी सरपंच तसेच विद्यमान सदस्या सौ. धनश्री सावंत दुसऱ्या उपाध्यक्ष सौ. रुपाली मोहिते, उपसरपंच सौ. वैशाली चव्हाण, गौरी सावंत, मा. सरपंच वैभव चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनिल काटे देशमुख, विठ्ठल काकडे, अजित काटे, दादासो सावंत (सोसायटी संचालक), विकास घोरपडे, प्रशांत कणसे (सरपंच), चंद्रकांत जाधव, तसेच स्वाभिमानी सखी मंचच्या सदस्य हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात अनेक ग्रामस्थ, युवक आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीची भावना जोपासली. रक्तदान हेच जीवनदान या भावनेतून झालेला हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरला.

Post a Comment
0 Comments