वेणेगाव - अतीत (ता. सातारा) येथे स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या सहकार्याने, तसेच लाडली फाउंडेशन व एनपीएसटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष डिजिटल व आर्थिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये महिलांना डिजीगोल्ड सारख्या डिजिटल गुंतवणूक पर्यायांची ओळख करून देण्यात आली. डिजीलॉकर वापर, आरोग्य विमा योजनांचे फायदे, तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना यासंदर्भात सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ. समता ताई घोरपडे व कार्याध्यक्ष सौ. तेजस्विनी ताई घोरपडे यांचे मार्गदर्शन. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या उपक्रमामुळे महिलांना डिजिटल युगाशी सुसंगत होण्याची संधी मिळाली असून, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याच्या दिशेने त्यांचे पाऊल अधिक मजबूत झाले आहे.असे प्रशिक्षणार्थी महिलांनी विचार व्यक्त केले
या वेळी अतीत येथील स्वाभिमानी महिला सखी मंच च्या सदस्या तसेच आ मनोज दादा घोरपडे युवा मंच चे कार्यकर्ते याच बरोबर अतीत येथील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments