Type Here to Get Search Results !

म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – चार लाखांच्या अपहार प्रकरणातील फरार मॅनेजरला सापळा रचून अटक

म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – चार लाखांच्या अपहार प्रकरणातील फरार मॅनेजरला सापळा रचून अटक

म्हसवड (ता. माण) – यश पेट्रोलपंप, म्हसवड येथील 4 लाख 11 हजार 279 रुपयांच्या अपहार प्रकरणातील फरार मॅनेजरला म्हसवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सोलापूर-सातारा सीमेजवळ सापळा रचून अटक केली. या उल्लेखनीय कारवाईने पोलिसांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यश पेट्रोलपंपचे जनरल मॅनेजर दुर्गेश पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत असलेला रणजीत नवनाथ सरगर (रा. दीडवाघवाडी, ता. माण, जि. सातारा) याने दिवसभरातील पेट्रोल-डिझेल विक्रीच्या रकमेतील हिशोबात अपहार करून तब्बल ₹4,11,279 चा अपहार केला होता. गुन्हा उघडकीस आल्यानंतर तो रक्कमेसह फरार झाला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पथके रवाना केली होती. आरोपी सतत मोबाईल क्रमांक बदलत आणि वेगवेगळ्या ठिकाणी लपून पोलिसांना चकवा देत होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याच्या हालचालींचा मागोवा घेत सोलापूर-सातारा सीमेवर पोलिसांनी त्याला वेशांतर करून पाठलाग करत अटक केली.

आज आरोपीस माननीय न्यायालयात हजर करत 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार नीता पळे या करत असून, पो.नि. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

या कारवाई साठी नीता पळे, भास्कर गोडसे, महावीर कोकरे, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, वसीम मुलानी, सतीश जाधव, अभिजीत भादुले, दया माळी या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.



Post a Comment

0 Comments