कोरेगावमध्ये स्वाभिमानी महिला सखी मंचच्या महिला संवाद मेळाव्यात महिलांना स्वावलंबनाचा मंत्र
वेणेगाव - कोरेगाव (ता.कराड) येथे आज स्वाभिमानी महिला सखी मंचच्या वतीने भव्य महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचाच्या अध्यक्षा सौ. समताताई मनोज घोरपडे यांनी महिलांसोबत संवाद साधतांना, महिलांनी राजकारण, समाजकारणात सक्रियपणे भाग घ्यावा, तसेच स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन केले.
मंचाच्या कार्याध्यक्षा तेजस्विनीताई संग्राम घोरपडे यांनी महिलांसाठी उद्योजकता विकास शिबिर घेण्यात येणार असून, महिलांना आवश्यक माहिती, तंत्रज्ञान पुरवले जाईल, असे सांगितले. त्यांनी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योगाच्या माध्यमातून प्रगती करावी, असे मार्गदर्शन केले.
मंचाच्या प्रतिनिधी सौ. जयश्री पवार यांनी महिलांसाठी आटा चक्की, शिलाई मशीन, टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप या वस्तूंवर ५०% सवलत उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमात कोरेगावचे बचत गट व सक्रिय महिला यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रुक्मिणी सावंत होत्या. यावेळी स्वाभिमानी महिला सखी मंचचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व कोरेगावमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना अश्विनी पाटील तर सूत्रसंचालन व आभार अजिंक्य शेवाळे यांनी केले
.jpg)
Post a Comment
0 Comments