म्हसवड परिसरात इलेक्ट्रिकल दुकान फोडून 1.69 लाखांचा माल लंपास
सातारा - म्हसवड ता. माण परिसरात चोरट्यांनी इलेक्ट्रिकल मोटार रिवायडींगच्या दुकानाला लक्ष्य करत तब्बल रु. 1,69,600/- किमतीचा माल लंपास केला.
हि घटना दि. 27 ऑगस्ट रोजी पहाटे 1.15 ते 2.15 वाजताच्या सुमारास मौजे वडजल हद्दीत कारंडेवाडी फाट्याजवळ घडली. विशाल इलेक्ट्रिकल मोटार रिवायडींग दुकानाचे लोखंडी गज कापून दोन अनोळखी चोरट्यांनी आत प्रवेश केला व मोनोब्लाँक, सबमर्शिबल मोटारी, कॉपर वायर, केबल, तसेच इतर साहित्य चोरीस गेले.
फिर्यादी महादेव जगन्नाथ पुकळे (रा. पुकळेवाडी, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा रजिस्टर क्र. 290/2025 प्रमाणे BNS 305, 331(4) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचे वर्णन फिर्यादीने पोलिसांना दिले असून दोघेही वय अंदाजे 30 वर्षांचे, चेहऱ्यावर हेडमास्क, हातात ग्लोज व पायात शूज घालून आले होते. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली.
.png)
Post a Comment
0 Comments