वेणेगावात महिलांसाठी आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
वेणेगांव - वेणेगाव ता सातारा येथील श्री पद्मावती माता मंदिर हॉल येथे महिलांसाठी आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. हा उपक्रम स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या सहकार्याने तसेच लाडली फाउंडेशन व एन पी एस टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
गावातील महिला मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या. त्यामध्ये सुप्रिया चव्हाण, सुरेखा चव्हाण, निवेदिता सावंत, धनश्री सावंत, नीता कळसकर, विमल घोरपडे, सुमन पवार, रूपाली चव्हाण, स्मिता सावंत, छाया सावंत, रोहिणी सावंत, सलीमा मुलाणी, सुप्रिया काकडे, शारदा शिंदे, गौरी सावंत, छाया काकडे, रेखा वायदंडे, विद्या काकडे आदींचा सहभाग लक्षणीय ठरला.
सदर कार्यक्रमासाठी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा समता ताई घोरपडे व कार्याध्यक्षा तेजस्विनी ताई घोरपडे यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे मार्गदर्शनपर शब्द पाठवून कार्यक्रमास आपली मानसिक उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाला रामचंद्र भोसले (सर), निवृत्त बँक अधिकारी, बँक ऑफ इंडिया व मेंटोर – स्वावलंबी भारत अभियान, सातारा जिल्हा तसेच विशाल जी साळुंखे, स्वावलंबी भारत अभियान, सातारा यांनी उपस्थित राहून महिलांना व्यवसायासाठी बँक कशी मदत करते व विविध शासकीय योजना कशा उपयुक्त ठरतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी महिला सखी मंच वेणेगाव प्रतिनिधी धनश्री सावंत तसेच संपर्कप्रमुख दादासाहेब घोरपडे यांनी केले.
तर प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शक म्हणून प्रमोद पंचपोर यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.

Post a Comment
0 Comments