Type Here to Get Search Results !

भरधाव ट्रकची भीषण धडक — १९ वर्षीय ओंकारचा अकाली अंत

 ---


भरधाव ट्रकची भीषण धडक — १९ वर्षीय ओंकारचा अकाली अंत

वेणेगाव - म्हसवड (ता. माण)  रस्त्यावर क्षणभराची निष्काळजीपणा किती मोठा जीवघेणा ठरू शकतो, याचे हृदयद्रावक उदाहरण सोमवारी सायंकाळी म्हसवड – पंढरपूर रस्त्यावर घडले. फक्त १९ वसंत पाहिलेला ओंकार रमेश खांडेकर (रा. लोणार खडकी, ता. माण) याचा भरधाव ट्रकच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला.

            सायंकाळी साडेचारच्या सुमारास ओंकार नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून मोटारसायकल (क्र. MH-12-RB-1939) घेऊन बाहेर पडत होता. इतक्यात पंढरपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने (क्र. MH-18-BZ-1325) पेट्रोल पंपासमोरच जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ओंकार गंभीर जखमी झाला आणि क्षणातच त्याने प्राण सोडले.

         ट्रकचालक विजय शाहू माने (वय 36, रा. गोंदवले बु, ता. माण) याने हयगई, अविचार आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याचा आरोप फिर्यादी विजय सोमा खांडेकर (वय 45) यांनी केला आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 267/2025 भा.दं.सं. कलम BNS 106(1), 281, 125(A), 125(B) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




Post a Comment

0 Comments