काशिळ गावातून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा शोधमोहीमेला वेग
वेणेगाव काशिळ (ता. सातारा) गावच्या हद्दीतील राहत्या घरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची गंभीर घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात ९ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास मुलगी घरातून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला, पण ती सापडली नाही. चार दिवसांनंतर अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
गुन्हा रजि. नं. १८९/२०२५ भा.दं.सं. कलम १३७(२) अंतर्गत दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

Post a Comment
0 Comments