Type Here to Get Search Results !

पद्मावती माता हायस्कूल वेणेगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


पद्मावती माता हायस्कूल वेणेगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांना वही, पेन, झेंडा, खाऊ व क्रीडा साहित्य वाटप – छोट्या विद्यार्थ्यांच्या भाषणाने मन जिंकले

वेणेगाव, ता. सातारा – श्री पद्मावती माता हायस्कूल वेणेगाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुनील काटे देशमुख यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून रणजीतसिंह राजाराम साळुंखे उर्फ रणूभाऊ, बबन महादेव कद्रे उर्फ भाऊ हे लाभले.

या प्रसंगी अंगणवाडीतील छोट्या विद्यार्थ्यांनी मनमोहक भाषणे सादर केली. उपस्थित पाहुण्यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. अंगणवाडी क्रमांक 336 मधील विद्यार्थिनी शर्वरी प्रमोद पंचपोर हिने राजमाता जिजाऊ यांच्याविषयी प्रेरणादायी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.

> गोड कौतुकाची चौकट

"लहान वयात इतक्या प्रभावी शब्दांत भाषण करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. शर्वरीचे आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार आणि जिजाऊंवरील आदर यामुळे सभागृहात उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमानाची झळाळी दिसत होती."

        कार्यक्रमात छोटी खाणी विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. आमदार मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह,वेणेगाव, सातारा तालुका विभागीय अधिकारी श्रीमंत तरडे व जिल्हा मध्यवर्ती बँक वेणेगाव शाखा यांच्या सहकार्याने प्रत्येक विद्यार्थ्याला वही देण्यात आली.

             शहीद जवान सतीश मोहन शिवणकर यांच्या स्मरणार्थ, वीरपत्नी सुजाता सतीश शिवणकर यांच्या तर्फे इयत्ता दहावीतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला तीन हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

            समतेचा युवा ग्राममंच, वेणेगाव तर्फे विद्यार्थ्यांना वही, पेन, झेंडा व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत तलाठी कार्यालय, संदीप चव्हाण,प्रसाद चव्हाण यांच्या तर्फेही खाऊचे वाटप झाले. विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका मनुकर मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्य वृद्धिंगत व्हावे या हेतूने हे साहित्य देण्यात आले.

 या वेळी मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांनी उपस्थितांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्व स्पष्ट केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशभक्तीची प्रेरणा दिली.

                  कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदरणीय शिक्षिका कोरे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार संजय कांबळे यांनी मानले.

               या सोहळ्यास ग्रामपंचायत वेणेगाव च्या सरपंच वंदना काटे, उपसरपंच वैशाली चव्हाण, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तलाठी वारके मॅडम, वि.वि. सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व सदस्य, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.






Post a Comment

0 Comments