देशमुखनगर, ता. सातारा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख नगर येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी गावचे सुपुत्र तथा जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी मा. श्री प्रकाश देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात सरपंच मा. श्री. संपत देशमुख म्हणाले की, “शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे. मुलांच्या शिक्षणासाठी गाव एकदिलाने उभे राहणे गरजेचे आहे.”
तर मा. श्री. प्रकाश देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गावाबद्दलची भावना आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काही योगदान देता आले तर त्यातच माझा आनंद आहे.”
कार्यक्रमास शिवकृपा सहकारी पतसंस्थेचे विभागीय अधिकारी मा. श्री. संतोष देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. सौ. अश्विनी देशमुख, मुख्याध्यापिका मा. सौ. हेमांगी भस्मे, शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटातील महिला, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी राजमाता पुण्यशील अहिल्याबाई होळकर पुरस्कार विजेते वैभवशाली महिला बचत गट अध्यक्ष सौ. दिपाली देशमुख व सचिव सौ. सुनंदा देशमुख यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. तसेच महिलांना व जेष्ठ नागरिकांना साक्षरता प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी रमेश गायकवाड व प्रशासक बाळासाहेब किवटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी नूतन काळा मंचाचे उदघाटनही करण्यात आले

Post a Comment
0 Comments