शेतकऱ्यांना दिलासा! व्याज सवलत योजनेतून ६० कोटींचा निधी वितरित
वेणेगाव, १२ ऑगस्ट — राज्यातील शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. Punjabrao Deshmukh व्याज सवलत योजने अंतर्गत सन २०२५-२६ साठी १०० कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ६० कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
ही योजना सहकारी, राष्ट्रीयकृत, ग्रामीण तसेच खासगी बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जावर लागू असून, नियोजित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ३% आणि केंद्र सरकारकडून ३% अशा एकूण ६% व्याज सवलत मिळते. यामुळे पात्र शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्जाची सोय होते.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत हा निधी संबंधित बँकांना वितरित करण्यात येणार आहे. निधीचा उपयोग नियमानुसार होण्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना शासनाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments