Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मार्गदर्शक पथसंचलन

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मार्गदर्शक पथसंचलन

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश मंडळामार्फत मिरवणुका काढल्या जातात. या पार्श्वभूमीवर तसेच ईद-ए-मिलाद सणामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोरगाव पोलिसांनी मार्गदर्शक पथसंचलन आयोजित केले.

या पथसंचलनात २ पोलिस अधिकारी, २ शिपाई अधिकारी, २० पोलिस अंमलदार, रायटर, प्लाटून व १६ पोलिस अंमलदार, २० होमगार्ड सहभागी झाले होते. पथसंचलनाद्वारे नागरिकांना शांतता, शिस्त व कायदा सुव्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावांमध्ये मोफत ड्रिलदेखील घेण्यात आली.

हे पथसंचलन मा. तुषार दोशी, पोलिस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी मा. वैशाली कडुक, अपर पोलिस अधीक्षक सातारा, मा. राजीव नवेले, पोलिस उपअधीक्षक सातारा शहर विभाग, तसेच सहा. पोलिस निरीक्षक धोंडीराम वाल्वेकर, पोलिस उपनिरीक्षक किशोर पानसरे, सुधीर भोसले, दीपक कारळे आदी अधिकारी उपस्थित होते.

👉 पोलिस प्रशासनाच्या या पथसंचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची व कायदा सुव्यवस्था राखण्याची जाणीव निर्माण झाली आहे.




Post a Comment

0 Comments