फक्त दोन तासांत चंदन चोर गजाआड! म्हसवड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
म्हसवड, ता. माण — म्हसवड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चंदन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करत तब्बल 1 लाख 10 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
धामणी येथील समाधान नागरगोजे यांनी त्यांच्या शेतातील बांधावर असलेली चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ तपास सुरू करत अवघ्या काही तासांत संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
अटक केलेले आरोपी:
1. उमाजी उत्तम चव्हाण, रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा
2. प्रमोद अण्णा धोत्रे, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा
या आरोपींकडून चंदन लाकूड नेण्यासाठी वापरलेली मोटरसायकल, झाडे तोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांना आज माननीय न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर करण्यात येत आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी आणि अंमलदार:
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,शहाजी वाघमारे,देवानंद खाडे,राजेंद्र कुंभार,संजय आस्वले,विनोद सपकाळ,श्रीकांत सुद्रिक,राहुल थोरात,संतोष काळे,महावीर कोकरे
म्हसवड पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांतून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments