काशीळमध्ये महिलांसाठी आर्थिक व डिजिटल साक्षरतेचा अभ्यासपूर्ण उपक्रम
काशीळ (ता. सातारा): स्त्रियांचे आर्थिक व डिजिटल सक्षमीकरण साध्य व्हावे, त्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लाडली फाउंडेशन व NPST यांच्या संयुक्त विद्यमाने काशीळ येथे महिला आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यात आले.
हा अभ्यासपूर्ण उपक्रम दत्त मंदिर परिसरात पार पडला. प्रार्थनेने सुरुवात होऊन वातावरण भक्तिमय झाले आणि सामाजिक बांधिलकीची प्रचीती आली. महिलांना डिजिगोल्ड, विमा योजना, म्युच्युअल फंड, पेन्शन योजना, टाइमपे, डिजीलॉकर आदी आधुनिक आर्थिक व डिजिटल संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.
या उपक्रमात प्रशिक्षक प्रमोद पंचपोर यांनी उपस्थित महिलांना सहज-सोप्या पद्धतीने आणि प्रभावी शैलीत आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ. समता ताई घोरपडे व कार्याध्यक्षा तेजस्विनी ताई घोरपडे यांचे प्रेरणादायी विचार. त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास, सशक्तीकरण आणि आर्थिक निर्णयक्षमतेची ज्योत जागवली.
या उपक्रमात काशीळ गावच्या सरपंच सौ. अर्चना कोरे, रहिमतपूर मंडल भाजपा उपाध्यक्षा सौ. यमुना जाधव, तसेच अश्विनी मुरूमकर, कुसुम जाधव, वैशाली जाधव, नूतन जाधव, श्रुती गुहागरकर, अर्चना जाधव, मालन जाधव, पूनम जाधव, अश्विनी जाधव, आशा पोतदार, रुक्मिणी जाधव (उमेद बचतगट) आदींची उल्लेखनीय उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या यशस्वीतेमागे कराड उत्तरचे लोकप्रिय व लोकसंग्रही आमदार मा. मनोज दादा घोरपडे यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीतून मिळणारा पाठिंबा मोलाचा ठरतो. त्यांच्या सामाजिक विकासदृष्टिकोनामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भक्कम पावले टाकली जात आहेत.
स्वाभिमानी महिला सखी मंचच्या सदस्यांमध्ये या उपक्रमामुळे आर्थिक व तांत्रिक जागरूकतेचा जागर झाला असून, पुढील उपक्रमांसाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments