काशीळमध्ये सोन्याची ४५ हजारांची चोरी उघडकीस; तीन महिला चोरट्या जेरबंद!
बोरगाव पोलिसांची चतुर कारवाई – मुद्देमालासह तिन्ही महिला आरोपी अटकेत
वेणेगाव - काशीळ (ता. सातारा) | दि. ६ ऑगस्ट दुपारी १ वाजण्याच्या सुमारास काशीळ येथील साई ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात तीन अनोळखी महिला ग्राहक म्हणून आल्या आणि त्यांनी ४५,००० रुपये किमतीची सोन्याची चमकी (150 नग, प्रत्येकी 50 नग असलेली तीन पाकिटे) अत्यंत हुशारीने व लबाडीने चोरून नेल्याची घटना घडली.
दुकानदार राहुल मुरलीधर धाराशिवकर यांनी तातडीने बोरगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. धोंडीराम वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली डिटेक्शन ब्रँच (DB) पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली. गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली. तपासादरम्यान, आरोपी महिला सातारा–कराड हायवेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, DB पथकाने काशीळ गावच्या हद्दीत श्रीराम मंगल कार्यालयासमोर सापळा रचला.
त्यानुसार, तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता, सोन्याच्या १५० नग चमकीसह तीन प्लास्टिक पाकिटे पोलिसांनी हस्तगत केली. चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या सतर्क कारवाईमुळे अवघ्या काही तासांतच परत मिळवण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला पुढीलप्रमाणे आहेत:
1. सावित्री पोपट पवार
2. मंगल मोहन धोत्रे
3. नंदा कुमार सावंत
(सर्व राहणार – खिंडवाडी, ता. सातारा)
या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी कौतुकाची थाप दिली आहे.
या तपासात पुढील अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान:
सहाय्यक पोलीस निरीक्षक – धोंडीराम वाळवेकर
DB पथकाचे अधिकारी व कर्मचारी –
संतोष चव्हाण, रुपेश कारंडे, दीपककुमार मांडवे, निलेश गायकवाड, नम्रता जाधव, प्रशांत चव्हाण, केतन जाधव, सतीश पवार, विशाल जाधव, अतुल कणसे, समाधान जाधव, महिला पोलीस – प्रियांका पवार
या कारवाईमुळे स्थानिक व्यापार्यांमध्ये व नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.
📝 विशेष:
पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि टीमवर्कमुळे अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लागला. चोऱ्यांमध्ये महिलांची वाढती भूमिका लक्षात घेता, व्यावसायिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment
0 Comments