Type Here to Get Search Results !

‘ति’चा गणपती आरतीसोहळ्यात समताताई घोरपडे यांचा सन्मान

‘ति’चा गणपती आरतीसोहळ्यात समताताई घोरपडे यांचा सन्मान

वेणेगाव : लोकमत ‘ति’चा गणपती प्रतिष्ठापना सोहळ्यात स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ. समताताई मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी लोकमतच्या ‘ति’च्या गणपती आरतीच्या संकल्पनेचे कौतुक केले व लोकमत कार्यालयातील स्टाफशी मनमोकळा संवाद साधला.

          या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वैशाली राजमाने व भाजप नेत्या सौ. सुरभी भोसले यांचीही उपस्थिती होती. संवादादरम्यान समताताई घोरपडे यांनी कराड उत्तर भागातील रेशनिंग व गरजू कुटुंबांचे धान्य वितरण बंद झाल्याच्या तक्रारी संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

       यावर जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. राजमाने यांनी आगामी काळात रेशनिंग कार्ड केवायसी अपडेटसह प्रलंबित कागदपत्रे पूर्ण करून व त्रुटी दुरुस्त करून पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेल, असे आश्वासन दिले.

       समताताई घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे कराड उत्तर भागातील गरजू कुटुंबांना योग्य वेळी धान्यपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

       या प्रसंगी लोकमत सातारा आवृत्तीप्रमुख, संपादकीय विभाग व लोकमत कार्यालयातील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता


.

Post a Comment

0 Comments