Type Here to Get Search Results !

समता ताई घोरपडे यांच्या हस्ते नवसाचा राजा बाल गणेश मंडळात महिलांची महाआरती

 समता ताई घोरपडे यांच्या हस्ते नवसाचा राजा बाल गणेश मंडळात महिलांची महाआरती

वेणेगाव  : गणेशोत्सवाच्या मंगलमय सोहळ्यात वेणेगाव (ता. सातारा) येथील नवसाचा राजा बाल गणेश मंडळात महिलांची महाआरती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली. या विशेष महाआरतीसाठी स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ. समता ताई मनोजदादा घोरपडे यांना मानाचा मान मिळाला. त्यांच्या हस्ते महाआरती लाभताच संपूर्ण वातावरण "गणपती बाप्पा मोरया"च्या गजरांनी दुमदुमून गेले.

या प्रसंगी शशी कॉम्प्युटरच्या संचालिका सौ. सारीक निकम, माजी सरपंच सौ. धनश्री सावंत तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता घोरपडे या मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिलांनी पारंपरिक पद्धतीने आरती, ओवाळणी व गजर करत बाप्पाच्या चरणी आपली निष्ठा व्यक्त केली.

महिलांच्या सामूहिक सहभागामुळे उत्सवाला वेगळीच शोभा प्राप्त झाली. उपस्थित मान्यवरांनी गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून महिला सक्षमीकरणाबरोबरच समाजातील भक्तीभाव व ऐक्य वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले.

    या महाआरती साठी सर्व गणेश भक्त तसेच महिलांची संख्या लक्षणीय ठरली.



Post a Comment

0 Comments