Type Here to Get Search Results !

मोरया नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार – दर्जेदार कामगिरीमुळे ठेवीदारांचा विश्वास अधिक बळकट

 मोरया नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार – दर्जेदार कामगिरीमुळे ठेवीदारांचा विश्वास अधिक बळकट

वेणेगांव : मोरया नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक मा. धनंजय शेडगे कदम यांच्या उपस्थितीत आणि चेअरमन श्री. जोतीराव शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या सभेला अंगापूर, निगडी, वरणे, फडतरवाडीसह परिसरातील गावांचे सरपंच-उपसरपंच, सोसायट्यांचे चेअरमन-व्हाईस चेअरमन, संस्थेचे संचालक, सभासद वर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक संचालक सुशांत शेडगे यांनी केले तर व्यवस्थापक विश्वजीत शेडगे यांनी वार्षिक अहवाल व लेखाजोखा मांडला.

यावेळी संस्थापक मा. धनंजय शेडगे म्हणाले की, “२०१३ मध्ये सर्वसामान्य नागरिकांना खासगी सावकारीतून मुक्तता मिळावी, त्यांच्या छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण व्हाव्यात या हेतूने संस्थेची स्थापना करण्यात आली. अल्पावधीतच दर्जेदार व शिस्तबद्ध कामकाजामुळे मोरया नागरी पतसंस्था सातारा तालुक्यात एक नावाजलेली संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. स्थापनेपासून सतत ‘अ’ वर्गाचे ऑडिट मिळाले असून ठेवीदारांचा विश्वास आणि कर्जवाटपातील काटेकोरपणा ही संस्थेची खरी ताकद आहे.”

संस्थेच्या कर्ज योजनांमुळे अनेक तरुण उद्योजक बनले आहेत. महिलांसाठी स्वयंरोजगार कर्ज, ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदर, सोनेतारण कर्जासारखे सुरक्षित पर्याय व नाविन्यपूर्ण ठेव योजना राबवून संस्थेने सहकाराचा खरा हेतू साध्य केल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्व. अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) तसेच स्व. सर्जेरावभाऊ शेडगे कदम यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी विविध क्षेत्रात कार्य करून ठसा उमटवलेल्या मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सभेला उपाध्यक्ष अनिलराव शेडगे, बाजार समितीचे संचालक हनमंतराव शेडगे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश कणसे, सुभाष जाधव गुरुजी, शफिक शेख, राजेंद्र कणसे, नवनाथ कणसे, डी.के. गुरुजी, अतुल गवळी, तुकाराम शेडगे, रणजीत शेडगे, शिवाजी सरगर, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र शेडगे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments