दत्ता घाडगे सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी – पत्रकार हितासाठी प्रभावी नेतृत्वाची निवड
वेणेगांव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई तर्फे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दत्ता कृष्णत घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य संघटक मा. संजयजी भोकरे, प्रदेशाध्यक्ष मा. गोविंद वाकडे व प्रदेश सरचिटणीस मा. विश्वासजी आरोटे यांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून तालुकाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य करत विविध उपक्रम राबविल्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा उपध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या हितासाठी काम करणे, संघटन मजबूत करणे व संघटनेच्या ध्येय–धोरणांना गती देणे या दृष्टीने ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.
या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष प्रविण कांबळे यांनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष व राज्य सल्लागार प्रमोद पंचपोर, उपाध्यक्ष विजय घोरपडे, सचिव संदीप जाधव, जेष्ठ पत्रकार सतिश जाधव, विजय अलाटे, सुनिल शेडगे, पा. पं. पवार, विकास जाधव, धनाजी कणसे सूर्यकांत पवार, प्रताप भोसले, नितीन साळूंखे, किरण पवार,,धनंजय माने,अविनाश करांडे, शंकर कदम, सुधीर जाधव अविनाश करांडे, शंकर कदम, सुधीर जाधव, मधुकर कणसे यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्हाउपाध्यक्ष नियुक्ती पत्र देताना जिल्हा अध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच मान्यवर
.jpg)
Post a Comment
0 Comments