“तळबीडमध्ये स्वाभिमानी महिला सखी मंचआमदार मनोजदादा घोरपडे प्रेरित सेवा पंधरवडा महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण”
सातारा : तळबीड (ता. कराड) येथे स्वाभिमानी महिला सखी मंच तसेच ग्रामपंचायत तळबीड यांच्या सहकार्याने तसेच लाडली फाउंडेशन व एनपीएसटी यांच्या पुढाकाराने महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या सेवा पंधरवडा अभियानाच्या भाग म्हणून आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून स्वाभिमानी महिला सखी मंचद्वारे महिलांचे आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण अभियान राबवले गेले.
या वेळी स्वाभिमानी महिला सखी मंचाच्या अध्यक्षा समताताई घोरपडे व कार्याध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे तसेच तळबीड गावच्या लोकनियुक्त सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच इंदुबाई शिंदे, माजी उपसरपंच दादासो मोहिते व वैशाली पाडळे, सदस्य संगिता मोहिते, सविता कुंभार, विशाल मोहिते व उमेश मोहिते, स्मिता मोहिते, यांच्यासह सखी मंचच्या प्रतिभा कांबळे (उंब्रज प्रतिनिधी) तसेच रुपाली मोहिते (कोपर्डे सातारा प्रतिनिधी)
सखी मंचाच्या अध्यक्षा समताताई घोरपडे मार्गदर्शन करताना म्हणाल्या,“आजच्या डिजिटल युगात महिलांनी मागे राहून चालणार नाही. या प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान हे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच समाजात सशक्तपणे उभे राहण्याची ताकद देईल.”
कार्याध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे यांनी सांगितले,महिला सशक्तीकरणाचा खरा पाया म्हणजे तंत्रज्ञानाची जाण असणे. मोबाईल, इंटरनेट, डिजिटल व्यवहार यांचा प्रभावी वापर महिलांना केवळ आर्थिक स्वावलंबन नाही तर आत्मविश्वास, दिशा आणि धाडस देखील देतो. प्रत्येक महिला जेव्हा डिजिटल व्यवहारातील नवे ज्ञान आत्मसात करेल, तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नव्हे तर आपल्या कुटुंब आणि समाजासाठीही नवे प्रकाशस्तंभ बनेल. या प्रशिक्षणातून महिलांमध्ये नवीन संधी शोधण्याची वृत्ती, निर्णयक्षमता आणि स्वतःवर विश्वास वाढेल, ज्यामुळे त्या भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतील.”
लोकनियुक्त सरपंच मृणालिनी मोहिते म्हणाल्या,“ग्रामपंचायत तळबीड नेहमीच महिलांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. आजच्या प्रशिक्षणामुळे गावातील महिलांना आधुनिक जगण्याची आणि प्रगतीची नवी दारे खुली झाली आहेत. भविष्यात अशा अनेक उपक्रमांना गावातील महिलांनी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.”
कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांनी महिलांसाठी प्रशिक्षणाचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशिक्षणार्थी महिलांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यानेही त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कार्यक्रमाला अधिक गती आणि विश्वास मिळाला.
प्रशिक्षणात डीजी गोल्ड, डीजे लॉकर, एनपीएसटी, इन्शुरन्स, टाइम पे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन झाले. यामुळे महिलांना डिजिटल व्यवहाराची सोपी समज मिळाली तसेच बचत व सुरक्षित गुंतवणुकीबाबत नवी दृष्टी लाभली.
सरसेनापती हंबीरराव मोहिते व ताराराणी भोसले यांच्या पावन स्मृतींनी उजळलेली तसेच श्रीराम मंदिरामुळे विशेष ओळख निर्माण झालेली तळबीडची पवित्र भूमी या यशस्वी उपक्रमाची साक्षीदार ठरली.
दरम्यान सुरवातीला तळबीड ग्रामपंचायत प्लास्टिक मुक्ती प्रोत्साहन म्हणून कापडी पिशवी वाटप शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रशिक्षक प्रमोद पंचपोर होते. या कार्यक्रमासाठी सखी मंचचे संपर्क प्रमुख दादासाहेब घोरपडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रस्तावित उपसरपंच दादासो मोहिते यांनी केले.

Post a Comment
0 Comments