बोरगाव ता. सातारा येथील पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर धाडसी कारवाई करून ७,०८०/- रुपये किंमतीची दारू जप्त केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
सदर कारवाई २५ आणि २६ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली. या प्रकरणी आरोपी वैभव मोहन निमज (वय ३६, रा. कुमठे, ता. सातारा) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. बोरगाव पोलिसांच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कामगिरीमुळे अवैध दारू विक्रीवर नियंत्रण मिळाले असून, स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
या यशस्वी कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा मिलिंद कुंभार, पोहवा गायकवाड, पोहवा दीपक मांडवे, पोलिस नाईक प्रशांत चव्हाण व मपोका कुसराम यांनी सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments