गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी १५ सराईत गुन्हेगार हद्दपार
वेणेगांव : गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत बोरगाव पोलिस ठाणे हद्दीतील १५ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे.
गणेशोत्सव हा प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या काळात समाजात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ते कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकतात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
हद्दपारी करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे पुढीलप्रमाणे :
अंकुश शिवाजी साठेकर, नाना महादेव मुळसुळे, संजय दत्त नेटक, ओंकारराजे पवार, आसोक पाडुरे, अलीम अरविंद साळुंखे, अमोल मोहन निमगडे, शकील गुलाब मुलाणी, अमिन गुलाम मुलाणी, सागर विजय राठोड, रोहन महादेव यादव, विक्रम अधिक यादव, वैभव विजय साळुंखे, गणेश गुलाब कारंडे आदी.
ही कारवाई मा. अपर पोलिस अधीक्षक व विशेष कार्यकारी दंडाधिकारी सातारा तसेच मा. कार्यकारी दंडाधिकारी व तहसीलदार सातारा यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. ४ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ पर्यंत या गुन्हेगारांच्या बोरगाव पोलिस ठाणे हद्दीत प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. बुजार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक मा. बैसाळ कडूकर, उपअधीक्षक मा. राजीव नवले तसेच पोलिस निरीक्षक धोंडीराम वाबळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडली.
👉 या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात नागरिकांनी निर्धास्तपणे व शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे
.jpg)
Post a Comment
0 Comments