अवधूत सायकल मार्टचे मालक अशोक जाधव यांचे निधन
वेणेगाव : अवधूत सायकल मार्टचे मालक अशोक सुदामराव जाधव (वय ५३) यांचे अल्पशा आजाराने रविवारी दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले.
ते नागठाणे पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार सतीश जाधव यांचे जेष्ठ बंधू होत. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने देशमुखनगर परिसरासह नागठाणे भागात हळहळ व्यक्त होत आहे.
पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, वहिनी, पुतणे, सून, नातू असा मोठा परिवार आहे. कुटुंबाच्या या दुःखात सर्व समाजमन सहभागी झाले आहे.
त्यांचा सावड्याचा विधी मंगळवार दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी देशमुखनगर येथे पार पडणार आहे.

Post a Comment
0 Comments