जनता दरबारात मांडली समस्या, मनोजदादांनी दिला दिलासा – नवी एस.टी. फेऱ्यांची सुरुवात!
तुकाईवाडी,कामेरी, देशमुखनगर, दुर्गळवाडी गावात नव्या एस टी फेऱ्या
वेणेगाव, (प्रमोद पंचपोर) –
कराड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सातारा परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या सोयीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा देशमुखनगर, कामेरी, तुकाईवाडी आणि दुर्गळवाडी या मार्गांवर १४ ऑक्टोबरपासून नव्या एस.टी. बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, प्रवासी, विद्यार्थी, वयोवृद्ध व अपंग नागरिकांमधून या निर्णयाचे मनस्वी स्वागत करण्यात येत आहे.
नवीन एस.टी. फेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
🚌 सातारा – देशमुखनगर: सकाळी ७.२० वा.
🚌 सातारा – कामेरी: दुपारी १.३० वा.
🚌 सातारा – दुर्गळवाडी: सकाळी ६.२० वा., दुपारी २.०० वा., सायंकाळी ५.०० वा.
🚌 सातारा – तुकाईवाडी: सायंकाळी ५.३० वा.
या नव्या फेऱ्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडणारी वाहतूक अधिक सुलभ झाली असून, दररोजच्या प्रवासाचा त्रास आणि वेळेचा अपव्यय दोन्ही कमी होणार आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गाला आणि महिला प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
जनता दरबारामध्ये नागरिकांनी उपस्थित केलेल्या वाहतुकीच्या अडचणींचा प्रश्न मनोजदादांनी स्वतःहून घेतला व मार्गी लावला, ही या निर्णयामागची जनाभिमुख भूमिका ठरली आहे.
जनतेच्या दैनंदिन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मनोजदादा यांनी सातत्याने घेतलेल्या प्रयत्नांमुळे एस.टी. विभागाने जनहिताचा निर्णय घेतला, हे कौतुकास्पद आहे. नागरिकांकडून “मनोजदादांचे मनःपूर्वक आभार!” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमामुळे सातारा तालुक्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या सोयींमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला असून, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी कार्यरत असलेले आमदार मनोजदादा घोरपडे यांचे हे आणखी एक लोकाभिमुख पाऊल ठरले आहे.

Post a Comment
0 Comments