मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर महामार्ग पोलिसांसाठी शास्त्रोक्त अपघात तपास प्रशिक्षण – सेव्हलाइफ फाउंडेशन आणि आयसीआयसीआय लोम्बार्डचा उपक्रम
पुणे,: ऑक्टोबर २०२५ – रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी सेव्हलाइफ फाउंडेशन आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रॅश इन्व्हेस्टिगेशन अँड सेफ पेट्रोलिंग ट्रेनिंग’ कार्यशाळा लोणावळा येथे १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली. या प्रशिक्षणात ६७ हून अधिक महामार्ग पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
या प्रशिक्षणात अपघात स्थळांचे शास्त्रोक्त मूल्यांकन, पुरावे दस्तऐवजीकरण, तसेच अपघातास कारणीभूत वाहन, मानवी आणि पर्यावरणीय घटकांचे विश्लेषण करण्याची पद्धत शिकविण्यात आली. तसेच सुरक्षित पेट्रोलिंग, जोखीम कमी करणे आणि प्रभावी घटना व्यवस्थापन यांवरही भर देण्यात आला.
जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील मृत्यूंच्या घटनांमध्ये ४५% घट नोंदली गेली आहे.
या कार्यक्रमाला रायगड महामार्ग पोलिस अधीक्षक श्री. तानाजी चिखले, उपअधीक्षक श्रीमती पुष्पलता दिघे, रायगड महामार्ग पोलिस व सेव्हलाइफ फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. चिखले यांनी सांगितले की, हे प्रशिक्षण आमच्या पथकांच्या क्षमतेत वाढ करून रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
सेव्हलाइफ फाउंडेशनचे संस्थापक व सीईओ श्री. पियुष तिवारी यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे अधिकाऱ्यांना अपघातांचे मूळ कारण समजून घेऊन प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यास मदत होईल.
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातमुक्तीच्या दिशेने हे प्रशिक्षण एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Post a Comment
0 Comments