वृक्षप्रेमी अधिकारी श्रीमंत तरडे यांचे अपघाती निधन
वेणेगाव (प्रमोद पंचपोर) : सातारा तालुक्यातील वेणेगाव गावचे सुपुत्र व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय विकास अधिकारी श्रीमंत भिकाजी तरडे (वय ५५) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सहकारी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कर्तव्यनिष्ठ, मनमिळाऊ आणि दूरदर्शी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. बँकेच्या प्रगतीसाठी त्यांनी निःस्वार्थपणे काम केले. शिस्तबद्ध, विचारपूर्वक कार्यपद्धतीमुळे ते अधिकारी म्हणूनच नव्हे तर मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान म्हणूनही ओळखले जात.
श्रीमंत तरडे हे वृक्षप्रेमी व आरोग्य-जागरूक अधिकारी होते. सायकलिंग व मॅरेथॉनमध्ये नियमित सहभाग घेत ते पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देत असत.
त्यांच्या अकस्मात निधनाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहकारी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments