Type Here to Get Search Results !

नांदगावच्या शेखरजी घोरपडे यांचा वाढदिवस मनोजदादांसमवेत साजरा!

"कराड उत्तरचे जननेते आ. मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत नांदगावचे युवा सामाजिक कार्यकर्ते शेखरजी घोरपडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!"

वेणेगाव (प्रमोद पंचपोर) - कराड उत्तर मतदारसंघाचे जनप्रिय आणि कार्यकर्त्यांच्या मनातील नेते आ. मनोजदादा घोरपडे यांच्या प्रेरणेतून आ. मनोजदादा युवा मंच आणि स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली फराळ व स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्यात नांदगाव (ता. सातारा) येथील आ. मनोजदादांचे कट्टर समर्थक व नांदगावचे युवा सामाजिक कार्यकर्ते शेखरजी घोरपडे यांचा वाढदिवस आमदार मनोजदादांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत अत्यंत आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मनोजदादांनी शेखरजी घोरपडे यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि आनंदमय वातावरणात वाढदिवस साजरा केला.

कार्यक्रमात कराड उत्तर मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते, स्वाभिमानी महिला सखी मंचाच्या सदस्य, मनोजदादा युवा मंचाचे पदाधिकारी आणि पत्रकार संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपावलीच्या या आनंदसोहळ्यात आपुलकी, सामाजिक सलोखा आणि जननेते मनोजदादांच्या नेतृत्वातील एकात्मतेचा भाव प्रकर्षाने जाणवला.




Post a Comment

0 Comments