Type Here to Get Search Results !

वेणेगाव पद्मावती माता (मठीचा माळ) मंदिराचा जीर्णोद्धार सुरू

 वेणेगाव पद्मावती माता (मठीचा माळ) मंदिराचा जीर्णोद्धार सुरू


वेणेगाव : वेणेगाव (ता. सातारा) येथील मठीचा माळ वरील श्री पद्मावती माता मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नुकताच करण्यात आला. पारंपरिक पूजा, मंत्रोच्चार व धार्मिक विधीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या वेळी गावातील मान्यवर, ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराचा जीर्णोद्धार हे गावाच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मंदिराच्या कामासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले असून, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे मंदिराचे वैभव पुन्हा उजळून निघेल अशी भावना व्यक्त करण्यात आली.




Post a Comment

0 Comments