Type Here to Get Search Results !

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या शिफारशीने हरपळवाडी शाळेत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय

 हरपळवाडी शाळेत इंटरअक्टीव्ह पॅनेल बोर्डचे आगमन — शिक्षकांचे स्वप्न झाले साकार

हरपळवाडी : गेली दोन वर्षांपासून शिक्षकवर्गाने पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. हरपळवाडी येथील शाळेला आधुनिक तंत्रज्ञानाची भेट मिळाली असून, शाळेला दोन लाख साठ हजार रुपये किंमतीचे दोन इंटरअक्टीव्ह पॅनेल बोर्ड कोपलॅन्ड कंपनी प्रा. लि. यांच्याकडून प्राप्त झाले आहेत.

या उपक्रमासाठी शाळेच्या वतीने  साठ हजार रुपये किंमतीचे दोन इंटरअक्टीव्ह पॅनेल बोर्ड मिळाल्या बद्दल कंपनीचे मॅनेजर. आबासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

सदर पॅनेल बोर्ड शाळेला मिळवून देण्यासाठी शिफारस करणारे सन्माननीय आमदार मनोजदादा घोरपडे, तसेच या कार्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे हरपळवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थ यांचेही शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

शाळेत अत्याधुनिक शिक्षण साधनांची भर पडल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शिक्षण प्रक्रियेत नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



Post a Comment

0 Comments