कराड उत्तरला दुष्काळमुक्तीची दिशा!
२५ कोटींच्या गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन
नागठाणे - मौजे करजोशी (ता. सातारा) – कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उरमोडी प्रकल्पाअंतर्गत २५ कोटी रुपये खर्चाच्या गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन रविवारी संपन्न झाले. या योजनेमुळे सासपडे, हरपळवाडी, गणेशवाडी, सोनापूर, जांभळेवाडी, अतीत, समर्थगाव अशा गावांतील एकूण २००० एकर जमीन ओलीताखाली येणार आहे.
कार्यक्रमाला राजेंद्र ढाणे, श्रीरंग गोरे, अजित साळुंखे, सुरेश पाटील, मदनभाऊ काळभोर, अधिकराव पाटील, नंदकुमार नलवडे तसेच मुख्य अभियंता अमर काशीद यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणी—ही माझी कटिबद्धता” : आमदार घोरपडे
यावेळी संबोधित करताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले
“कराड उत्तरमधील अनेक गावे पुनर्वसित होऊनही वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे ही योजना मंजूर करता आली. येथील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
योजनेचे काम एक वर्षात पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. काम दर्जेदार व वेळेत व्हावे यासाठी स्वतः देखरेख करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळावर अंतिम वार — तीन मोठ्या योजना मार्गी
आमदार घोरपडे यांनी यावेळी माहिती दिली की :
समर्थगाव उपसा सिंचन योजना
काशीळ उपसा सिंचन योजना
यांच्या टेंडर प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
“या तिन्ही योजना पूर्ण झाल्यानंतर हायवेच्या वरचा संपूर्ण सातारा तालुका ओलीताखाली येईल व कायमचा दुष्काळ संपुष्टात येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारच्या मार्गदर्शनातून ११ उपसा योजना गतीमान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तरमधील ११ उपसा सिंचन योजना एक वर्षात पूर्ण होणार आहेत.
यामुळे कराड उत्तर पूर्णपणे दुष्काळमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे आमदारांनी सांगितले.
उपस्थित मान्यवर
एड. धनाजी जाधव, कृष्णात शेडगेमामा, किशोर ठोकळे, सुभाष ढाणे, पी. वाय. ढाणे, सर्जेराव यादव, बाळासो साळुंखे, डॉ. अजित जाधव, दिलीप मोरे, बाळासाहेब लोहार, सुभाष यादव, अंकुश डांगे, संजय कदम, तुषार निकम, दिलीप पन्हाळकर, सुधीर जाधव, सुरज जाधव, नागेश जेटके, प्रवीण चव्हाण, हरिभाऊ साळुंखे, महिलांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
आभार तात्यासो यादव यांनी मानले.
फोटो
व्यासपीठावर बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे, सुरेश तात्या पाटील, कार्यकारी अभियंता अमर काशीद, सरपंच जयसिंग पन्हाळकर व मान्यवर

Post a Comment
0 Comments