Type Here to Get Search Results !

चरेगावात आमदार मनोजदादा घोरपडे यांचा भव्य वर्षपूर्ती सत्कार

 “चरेगावात आमदार मनोजदादा घोरपडे यांचा भव्य वर्षपूर्ती सत्कार; 760 कोटींच्या विकासनिधीचे जनतेकडून स्वागत” 

प्रतिनिधी (प्रमोद पंचपोर):-

चरेगाव :- जनतेची सेवा करण्यासाठी ईश्वराने ताकद द्यावी… या भावनेने कार्य करणारे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या आमदारकीचा एक वर्षपूर्ती सत्कार सोहळा चरेगाव येथे उत्साहात पार पडला.

कराड उत्तरसाठी 760 कोटींचा विकासनिधी मंजूर करून आणण्याच्या पार्श्वभूमीवर गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मा. सभापती पतंगराव माने, मा. पं. स.स. मोहनराव माने, उद्योजक विलासतात्या माने, सरपंच देवदत्त माने व आमदार मनोजदादा युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमास रामकृष्ण वेताळ (प्रदेश सचिव), बाळासाहेब चोरेकर, सुरेशतात्या पाटील यांसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

गावातून आमदार घोरपडे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या निनादात वर्षपूर्ती सोहळ्याचा उत्साह वाढवणारा नगरी सत्कार करण्यात आला. अध्यात्माचे प्रतीक म्हणून विठ्ठल-रखुमाईची मूर्ती देऊन आमदारांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी खालकरवाडीचे माजी सरपंच अमर माने व सरपंच हर्षेराव जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला

आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले—

“मी सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे. लोकांसाठी काम करताना मला आनंद मिळतो. ही सेवा करण्यासाठी ईश्वराने मला शक्ती द्यावी अशी प्रार्थना आहे. निवडून आल्यानंतर पहिल्या अधिवेशनातच कराड उत्तरच्या पाणी योजनेचे व उंब्रज उड्डाणपुलाचे प्रश्न मांडले. त्यावर एक वर्षात मार्ग काढता आला, ही जनतेच्या आशीर्वादाचीच ताकद आहे. पुढील काळात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दळणवळण सुधारण्यावर भर देणार आहे.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने मतदारसंघासाठी वाढीव निधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उंब्रज–चोरे रस्ता सुधारण्यासाठी 20 कोटींचा नवीन निधी मिळाल्याचेही त्यांनी जाहीर केले

पतंगराव माने यांचा ‘प्रेमाचा सल्ला’

व्यासपीठावरून बोलताना पतंगरावअण्णा माने म्हणाले,

“राजकारण हे ठराविक लोकांचंच राजकारण राहिलं आहे. असे काही लोक गाव-विभाग बिघडवणारे आहेत. तुम्ही ‘आम’ म्हणजे सर्वसामान्य जनतेचे आमदार आहात. लोकांसाठी तुमचे दार नेहमी खुले आहे. ते पाहून काहींची दुकानदारी बंद पडतेय. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा,” असा सल्ला त्यांनी दिला.या वेळी प्रास्ताविक हिमांशू शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन  अनिल माने यांनी केले

यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, गावकरी उपस्थित होते



Post a Comment

0 Comments