Type Here to Get Search Results !

कराड उत्तरमध्ये ‘मनोजदादा’ प्रभाव झळकतोय…!


कराड उत्तरमध्ये ‘मनोजदादा’ प्रभाव झळकतोय…!

बाळासाहेब पाटील गटाला मोठा धक्का — हनुमानवाडी व भावनवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

वेणेगाव (प्रमोद पंचपोर) - कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून भाजपचा वेग प्रचंड वाढलेला आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याचं राजकीय पटलावर स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे कराड उत्तर मधील अनेक गावे प्रत्यक्ष आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

काल हनुमानवाडी व भावनवाडी या बळकट गडातून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील दोन दिवसांपूर्वी तळबीड, बेलवडे हवेली, तासवडे आणि जुने-नवीन कवठे या गावातही पक्षप्रवेश सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले होते.

राजकीय वर्तुळात म्हटलं जातं :

“एक काळ होता जेव्हा कराड उत्तर मधील छोटी-छोटी गावे ही बाळासाहेब पाटील यांची जमेची बाजू होती; आज तीच गावे मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत".

यामागचं मुख्य कारण —

आ. मनोजदादा घोरपडे यांनी आमदार झाल्यापासून प्रत्येक गावात सातत्याने केलेली विकासकामं, त्यांचा दांडगा जनसंपर्क, आणि गावागावात पोहोचलेला पक्षाचा संदेश.

काल भवानवाडी व हनुमानवाडीमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम पार पडले. यावेळी माजी सरपंच महादेव पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला.


या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती —

महेश बाबा जाधव, उमेश मोहिते, योगीराज सरकाळे, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब शिंदे, सरकार, प्रवीण नलवडे, शहाजी मोहिते, किरण पवार आदींची होती.

विशेष चौकट :

हनुमानवाडी — 100% बाळासाहेब पाटील गट असलेलं गाव

या गावातील कार्यकर्त्यांची मोठी संख्या भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने — “कराड उत्तरमध्ये भाजपचे शत-प्रतिशत चित्र दिसायला आता फार वेळ लागणार नाही” अशी जोरदार चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे

कराड उत्तरमध्ये सुरु झालेली पक्षांतराची लाट दिवसेंदिवस प्रचंड वाढत असून या धक्क्यातून बाळासाहेब पाटील गट सावरताना दिसत नाही. आगामी काळात या मतदारसंघात आणखी मोठे राजकीय भूकंप घडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.



Post a Comment

0 Comments