Type Here to Get Search Results !

सातारा तालुका ठाम — १२ ते १४ नोव्हेंबर संपूर्ण बंद

 


‘आता बस!’ महा ई-सेवा केंद्रांचा संप — शासनाला जाग येणार का?

१२-१३-१४ नोव्हेंबर राज्यव्यापी लॉकआऊट; सातारा जिल्ह्याचीही तडाखेबाज साथ

वेणेगाव (प्रमोद पंचपोर ) : महा ई-सेवा व आधार सेवा केंद्रांचा ३ दिवसीय राज्यव्यापी संप जाहीर करण्यात आला असून सातारा जिल्ह्यासह सातारा तालुक्याचा देखील तुफान सहभाग असणार आहे. केवळ आश्वासनांवर आता महा ई सेवा संचालक शांत बसणार नसल्याची भूमिका या आंदोलनातून स्पष्ट झाली आहे.

सातारा तालुक्यातील  महा ई सेवा केंद्र संघटनेचे तालुका अध्यक्ष सतीश साळुंखे यांनी सांगितले की, “आम्ही नागरिकांना प्रत्येक सरकारी सेवा, योजना, प्रमाणपत्रे वेळेवर देतो. मात्र उलट शासन आणि कंत्राटदारांकडून आम्हाला सतत अन्यायकारक दबाव, आर्थिक गळचेपी, विलंबित पेमेंट आणि नवीन नियमांच्या नावाखाली दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागत आहे. ५ वर्षांपासून निवेदने देत आहोत, पण शासन बहिरे झाले आहे!”

यासंदर्भात सातारा चे तहसीलदार समीर यादव यांना निवेदन देण्यात आले.

सातारा जिल्हाध्यक्ष समाधान माने यांनी स्पष्ट सांगितले की — सातारा जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्रे १२, १३ व १४ नोव्हेंबर रोजी पूर्णपणे बंद राहणार आहेत. कारण पुढे एकच ध्येय — शासनाने तातडीने वेतन सुधारणेसह बाकीचे निर्णय कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात अंमलात आणावेत.

या दरम्यान आधारविषयक सेवा, अपडेट/नवीन आधार, तसेच सर्व प्रकारची शासकीय सेवा या ३ दिवसात पूर्णत: बंद राहणार आहेत. नागरिकांना यामुळे काही प्रमाणात गैरसोय होईल; परंतु केंद्र संचालकांच्या छातीत अडकलेली वेदना आणि आर्थिक पिळवणूक आता पचवून घेणे शक्य नाही.

“आता शब्द नाही, कृतीच पाहिजे!”

शासनाने पुन्हा मौन धरले तर हे आंदोलन आणखी आक्रमक करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.




Post a Comment

0 Comments