Type Here to Get Search Results !

. स्वाभिमानी–लाडली फाऊंडेशन–एनपीएसटीचे डिजिटल प्रशिक्षण शिबिर

वर्णे (ता. सातारा) येथील विठ्ठल

मंदिरात महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

प्रतिनिधी प्रमोद पंचपोर:-

वर्णे (ता. सातारा) येथील विठ्ठल मंदिरात महिलांसाठी आर्थिक साक्षरता व डिजिटल व्यवहार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. लाडली फाऊंडेशन व एनपीएसटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

शिबिरामध्ये महिलांना ऑनलाईन बँकिंग, यूपीआय व्यवहार, सुरक्षित डिजिटल पेमेंट्स, सरकारी आर्थिक योजना, बचत पद्धती व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत उपयुक्त मार्गदर्शन देण्यात आले. ग्रामीण महिलांना डिजिटल जगाशी जोडण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले.

 कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांचे मार्गदर्शन

महिलांनी डिजिटल व आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

 तेजस्विनी ताई घोरपडे यांचे मनोगत

“ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल व्यवहार करता यावेत, आर्थिक स्वावलंबन वाढावे यासाठी असे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. महिलांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव सोबत आहोत.”

शिबिरास प्रणिता प्रतीक पवार, बिंदू संजय पवार, दीपाली संजय काळंगे, उषा संभाजी पवार, नलिनी शिवाजी सपकाळ, वनिता पांडुरंग पवार या महिला उपस्थित होत्या.

 प्रणिता पवार यांचे मनोगत

“डिजिटल व्यवहारांबाबतची भीती दूर करून आत्मविश्वास वाढवणारे हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आहे. आम्हाला मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

          कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून प्रमोद पंचपोर यांनी प्रशिक्षण दिले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी महिला सखी मंचाचे संपर्क प्रमुख दादासाहेब घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रशिक्षण शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले.





Post a Comment

0 Comments