नागठाणे जि.प. गटात नलवडे यांची लोकप्रियता दुणावली; नागरिकांचा वाढता विश्वास
प्रतिनिधी (प्रमोद पंचपोर):-
नागठाणे जि.प. गटातील इच्छुक उमेदवार नंदुकुमार नलवडे (नाना) यांचा मतदारसंघातील प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून गावोगाव होत असलेल्या त्यांच्या जनसंपर्काला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात “आपलेपण जपणारा, गावाच्या विकासाचा विचार करणारा उमेदवार” अशी भावना नलवडे (नाना) यांच्याबाबत तयार झाली आहे.
गेल्या काही दिवसांत नागठाणे गटातील विविध गावांमध्ये त्यांनी केलेल्या भेटी, घर दर्शन, तसेच नागरिकांशी साधलेला थेट संवाद यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, तरुणांच्या रोजगाराच्या संधी, महिलांच्या विकास उपक्रम अशा अनेक मुद्यांवर ते सातत्याने जनतेचे विचार जाणून घेत आहेत.
नंदुकुमार नलवडे (नाना ) यांनी आतापर्यंत दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक लाट निर्माण झाली असून “जनतेच्या मनातील उमेदवार” म्हणून त्यांची छाप अधिक ठळक होत आहे. गटातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, महिला, युवक तसेच वयोवृद्ध वर्गाकडूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नागठाणे जि.प. गटातील आगामी निवडणुकीत 'नाना' यांची लोकप्रियता निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांचा प्रभाव गटात ठळकपणे जाणवत आहे

Post a Comment
0 Comments