माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा मोठ्या लोंढ्याने भाजपमध्ये प्रवेश
“२५ वर्ष जे जमले नाही ते एका वर्षात झालं; म्हणूनच लोक भाजपमध्ये येत आहेत” – आमदार मनोजदादा घोरपडे
रहिमतपूर (प्रमोद पंचपोर) : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आज पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा मोठा लोंढा भाजपमध्ये प्रवेशला. रहिमतपूर येथील माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवकांसह विविध संस्थांचे अध्यक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश जाहीर केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये –
नाना एकनाथ राऊत (माजी उपनगराध्यक्ष रहिमतपूर), विकास माने (माजी नगरसेवक), अमर मदने (अध्यक्ष अदय क्रांतीवीर उमाजी राजे नाईक संघटना), नंदकुमार माने पाटील (अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्था), यशवंत चव्हाण, बाळासाहेब गोरेगावकर, धनंजय माने (अध्यक्ष कोरेगाव तालुका केमिस्ट असोसिएशन) तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक विक्रमसिंह माने, विकास तुपे, साहेबराव माने आणि प्रशांत भोसले यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “कराड उत्तरमध्ये आज विकासाला गती दिली आहे. केंद्र-राज्यात भाजप सत्ता असल्याने विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. माजी आमदारांनी २५ वर्षे ज्यांना हातही लावला नाही अशी कामे आम्ही एका वर्षात मार्गी लावली. म्हणूनच जनता आणि कार्यकर्त्यांचा विश्वास भाजपकडे वाढतो आहे.”
हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन, पाल-इंदोली उपसा सिंचन, उंब्रज पारदर्शक उड्डाणपूल, प्रकल्पांचे वेगाने होणारे मंजुरी व निधी मिळणे – यामुळे रहिमतपूर नगरपालिकेत सत्तेचा बदल निश्चित असल्याचा सूर कार्यक्रमात उमटला.
कार्यक्रमास आमदार मनोजदादा घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, विरोधी पक्षनेते निलेश माने, रहिमतपूर मंडळ अध्यक्ष रणजीत माने, चेअरमन विकास सेवा सोसायटी विक्रम माने आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments