Type Here to Get Search Results !

चिरेबंदी वाड्याने उघडले भाजपकडे दरवाजे! राष्ट्रवादीसाठी अजून एक “खिंडार” – कराड उत्तरमध्ये मनोजदादांचा प्रभाव


रहिमतपूरच्या चिरेबंदी वाड्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी गटाला पुन्हा धक्का; मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

वेणेगाव (प्रमोद पंचपोर ) – रहिमतपूर येथील प्रसिद्ध असणाऱ्या चिरेबंदी वाड्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विकास सेवा सोसायटीचे संचालक विकास माने यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी जिल्हा समन्वयक सुनील तात्या कटकर, निवडणूक प्रमुख धैर्यशीलदादा कदम, प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष संपतदादा माने यांसह निलेश माने, नंदकुमार माने, विक्रम माने, रणजीत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

रहिमतपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी गटाला सतत प्रवेशाच्या रुपाने धक्का बसत असून, त्याचे सत्र अखंड सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज चिरेबंदी वाड्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला.

आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “नवीन कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात मनापासून स्वागत आहे. जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पक्षाची धोरणे तळागाळात राबवली जातील. तसेच उमेदवार निवड स्थानिकांशी चर्चा करूनच केली जाईल.”

या वेळी शहाजी माने, सुरेश माने, युवराज माने, उमेश माने, सुनील माने, विक्रम माने, निखिल माने, पंकज जाधव, गौतम माने, तानाजी माने, विकास माने, श्रीकांत देशमुख, जगन्नाथ पाटील, रोहन पवार यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच साहेबराव माने, सचिन बिलागडे, राऊत सर, बाळासाहेब गोरेगावकर, विकास तुपे, प्रवीण माने, विश्वासराव बापू, अमर मदने, शेखर माने, अशोकराव माने, जयवंत माने, जगदीश गायकवाड, एड. महेश भोसले, प्रशांत भोसले, विजय माने, सतीश लवंगारे, धनंजय माने, विजयराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments