Type Here to Get Search Results !

वर्णे-आबापुरीतील श्री काळभैरव मंदिरात उद्या जन्मकाळाचा सोहळा

 वर्णे-आबापुरीतील श्री काळभैरव मंदिरात उद्या जन्मकाळाचा सोहळा

वेणेगाव ( प्रमोद पंचपोर) : वर्णे-आबापुरी (ता.सातारा) येथे बुधवारी (ता.१२) स्वयंभू श्री काळभैरवनाथांच्या जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा भाविकांसाठी अध्यात्मिक आनंदाची मेजवानी ठरणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.

सकाळी ९ ते १२ दरम्यान होमहवनाचा पवित्र विधी पार पडणार आहे. संध्याकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत भागवताचार्य, संगीत विशारद दीपक महाराज मेटेशास्त्री (केज, अंबाजोगाई, बीड) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत परिसरातील सुप्रसिद्ध भजनी मंडळांकडून भक्तीमय भजन सेवा सादर केली जाणार आहे.

रात्री बरोबर १२ वाजता जन्मकाळाचा मंगल सोहळा संपन्न होणार असून या दैवी उत्सवाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री काळभैरव देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments