Type Here to Get Search Results !

“जनतेचा विश्वास, आमदारांचे आश्वासन पूर्ण—हणबरवाडी टप्पा 2 मार्गी"

हणबरवाडी टप्पा क्रमांक 2 ची निविदा जाहीर… जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिलेला शब्द पाळला!

डिसेंबर अखेर कामाला प्रत्यक्ष सुरुवात; जनतेचा विश्वास अधिक भक्कम…

(प्रमोद पंचपोर):-

मसूर :- कराड उत्तर मतदार संघातील धनगरवाडी–हणबरवाडी उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्षे केवळ कागदोपत्री गाजत होती. निवडणूक आली की घोषणा, निवडणूक संपली की शांतता… अशी परिस्थिती जवळपास 40 वर्षे कायम होती. मात्र कराड उत्तरचे जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या ऐतिहासिक योजनेला अखेर गती मिळाली आहे.

पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाल्यानंतर, योजनेतील सर्वात महत्त्वाचा हणबरवाडी टप्पा क्रमांक 2 याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून डिसेंबर 2025 अखेर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. निवडणुकीत दिलेला शब्द सहा महिन्यांत पाळणारे आमदार म्हणून दादांचे जनमानसात स्थान अधिक दृढ झाले आहे.

या निविदेत पंपगृह, वितरण हौद, उर्ध्वगामी नलिका, बंदिस्त वितरण व्यवस्था, संरक्षक भिंत, पोहोच रस्ता, स्लॅब ड्रेन, तसेच सबमर्सिबल पंप, विद्युत–यांत्रिकी उभारणी व चाचणी अशी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत.

अंतवडी, किवळ, खोडजाईवाडी या गावांसाठी विद्युत पुरवठा करण्यासाठी विद्युत वाहिनी व रोहित्रे उभारण्याची योजनाही गतीने राबवली जाणार आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित असणारी गावे आता प्रत्यक्ष ओलिताखाली येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पूरक सहकार्यामुळे संपूर्ण प्रकल्प जलदगतीने पूर्ण होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

“डिसेंबर अखेर धनगरवाडी–हणबरवाडी टप्पा क्रमांक 2 सुरू करणार,” अशी माहिती स्वतः आमदार मनोजदादांनी दिली असून या घोषणेने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चार दशकांची प्रतीक्षा संपवत जनतेचा विश्वास पूर्ण करणाऱ्या मनोजदादांनी पुन्हा एकदा सिद्ध केले—

“दिलेला शब्द… म्हणजे पूर्ण केलेले काम!”




Post a Comment

0 Comments