🔶 परीट समाजाच्या वतीने वेणेगावमध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी 🔶
प्रमोद पंचपोर :-
वेणेगाव - वेणेगाव येथे थोर समाजसुधारक, स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी अत्यंत भक्तिमय व सामाजिक भान जपणाऱ्या वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास समस्त परीट समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
“गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाळा” या भक्तीगीतांच्या गजरात कार्यक्रमास सुरुवात झाली. या भक्तीगीतांच्या माध्यमातून संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धा दूर करून स्वच्छता, समता, सेवा व माणुसकीचा संदेश समाजाला दिला, हे उपस्थितांना पुन्हा एकदा स्मरण करून देण्यात आले.
संत गाडगेबाबांच्या शिकवणीनुसार विचारांपेक्षा कृती महत्त्वाची या भावनेतून परीट समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी कृष्णा नदी काठाची स्वच्छता, तसेच स्मशानभूमी व परिसराची साफसफाई करून स्वच्छतेचा जिवंत व प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संत गाडगेबाबांचा सामाजिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सामाजिक ऐक्य, सेवा व श्रमदानाचा आदर्श घालून देणारी ही पुण्यतिथी प्रेरणादायी ठरली.




Post a Comment
0 Comments