मानवतेचा आदर्श ठरले बोरगाव पोलीस
दिव्यांग व्यक्तीकडून कॅलेंडर खरेदी करत दाखवली सामाजिक बांधिलकी
प्रमोद पंचपोर :
प्रतिनिधी : बोरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा आणि सामाजिक जाणिवेचा एक प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. स्वावलंबनासाठी कष्टाने कॅलेंडर विक्री करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीकडून कॅलेंडर खरेदी करून बोरगाव पोलिसांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, दिव्यांग व्यक्तीच्या आत्मसन्मानाला बळ देणारा ठरला आहे. “पोलीस म्हणजे फक्त कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक नव्हेत, तर समाजातील दुर्बल घटकांचे आधारस्तंभ आहेत,” हेच या कृतीतून अधोरेखित झाले आहे.
बोरगाव पोलिसांच्या या स्तुत्य आणि अनोख्या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सर्वत्र त्यांचे कौतुक व शाबासकीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे समाजात माणुसकी, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बोरगाव पोलिसांना मनापासून सलाम!
हा उपक्रम निश्चितच इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

Post a Comment
0 Comments