Type Here to Get Search Results !

युवा नेतृत्व राहुल दादा गायकवाड ठरताहेत जनतेची पहिली पसंती

 युवा नेतृत्व राहुल दादा गायकवाड यांचा वाढता जनसंपर्क – वर्णे जिल्हा परिषद गटातून एक सशक्त उमेदवारी

प्रतिनिधी - वर्णे जिल्हा परिषद गटात युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे राहुल दादा गायकवाड सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. गावोगावी सुरू असलेल्या त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची त्यांची कार्यशैली जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत आहे.

निसराळे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी केलेले विविध समाजोपयोगी उपक्रम, विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी केलेले प्रयत्न आजही लोकांच्या स्मरणात आहेत. या अनुभवाच्या बळावर ते मोठ्या जबाबदारीसाठी सज्ज झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

वर्णे गटात त्यांना मिळणारा अफाट प्रतिसाद पाहता, तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. पारदर्शक नेतृत्व, प्रामाणिक कामकाज आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद हीच त्यांची ओळख बनली आहे.

आगामी काळात राहुल दादा गायकवाड यांची ही सशक्त उमेदवारी वर्णे गटाच्या राजकारणात नवे सकारात्मक परिवर्तन घडवेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत




Post a Comment

0 Comments