Type Here to Get Search Results !

क्ष मोठा, व्यक्ती लहान’ — शिवाजी डांगे यांचा भाजपासाठी निर्णय

“नागठाणे गणात भाजपला मोठा दिलासा — शिवाजी डांगे यांची अपक्ष उमेदवारी माघारी”

प्रतिनिधी -  नागठाणे पंचायत समिती गणाच्या राजकारणात भाजपासाठी काही काळ निर्माण झालेली डोकेदुखी अखेर संपुष्टात आली आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, रहिमतपूर मंडलचे सरचिटणीस व सासपडे गावचे प्रभावी नेतृत्व शिवाजी डांगे यांनी आपली अपक्ष उमेदवारी माघारी घेतल्याने पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने शिवाजी डांगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांच्या प्रभावामुळे भाजपसमोर निवडणुकीत आव्हान उभे राहिले होते. मात्र, “पक्ष मोठा, व्यक्ती लहान” या भूमिकेतून त्यांनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देत आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

डांगे हे गेली १५ वर्षे भाजपसाठी निष्ठेने कार्यरत असून नागठाणे गटातील अनेक गावांमध्ये त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मोठे बळ मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय भाजपसाठी अत्यंत सकारात्मक मानला जात असून आगामी निवडणुकीत याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



Post a Comment

0 Comments