चौकात चर्चा, गल्लीत चर्चा – वैभव चव्हाणच!
वेणेगाव - वर्णे जिल्हा परिषद गटात सध्या कुठेही नजर टाकली तरी एकच नाव चर्चेत आहे—वैभव चव्हाण. चौकात उभं राहिलं, गल्लीतून चालताना कानावर पडलं, की लोकांच्या बोलण्यात एकच सूर ऐकू येतो, “यंदा वैभव चव्हाणच!” अशीच चर्चा सध्या संपूर्ण गटात रंगलेली आहे.
गावोगावी सुरू असलेल्या पदयात्रा, घरभेटी आणि कोपरा सभांमुळे वैभव चव्हाण यांचा प्रचार जोरात सुरू असून सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत झालेल्या प्रचार कार्यक्रमांमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला असून वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले आहे.
शेतकरी प्रश्न, पाणी, रस्ते, वीज, शिक्षण आणि युवकांच्या रोजगारासारख्या मुद्द्यांवर वैभव चव्हाण थेट आणि ठाम भूमिका मांडताना दिसत आहेत. साधी भाषा, आपुलकीचा संवाद आणि विकासाचा स्पष्ट विचार यामुळेच सामान्य मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहे.
एकंदरीत, वर्णे गटात सध्या चौकात चर्चा असो की गल्लीत गप्पा—लोकांच्या तोंडी एकच नाव, ते म्हणजे वैभव चव्हाण, असेच चित्र दिसत आहे.

Post a Comment
0 Comments